गुन्हे विषयक

पुण्यात विद्यार्थिनीची वसतीगृहात आत्महत्या !

Pune city News:- पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनीने वसतीगृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. समिधा कालीदास राऊत (वय-20) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. समिधा हिचा मृतदेह गुरुवारी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.मिळालेली माहिती अशी की, समिधा राऊत ही गडचिरोली येथील मूळ रहिवासी होती. हिवताप विभागात कार्यरत कालीदास राऊत यांची कन्या तर ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांची ती पुतणी होत. समिधा पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षात शिकत होती. सिम्बॉयसिस गर्ल्स होस्टेल, ( विमाननगर, पुणे) रोहिल मिथील इमारतीच्या खोलीत ती राहत होती.एक एप्रिलच्या रात्री दैनंदिन हजेरीच्या वेळी समिधा उपस्थित नव्हती. तिच्या खोलीचे दार बंद असल्याने वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने बाल्कनीच्या बाजूला असलेल्या पॅनलमधून खोलीत प्रवेश केला. तेव्हा समिधा खोलीतील पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तिला खाली उतरवले. त्यानंतर डॉक्टर व पोलिसांना पाचारण केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.पोलिसांनी समिधाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. समिधा राऊत ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिचा मृत्युबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

News Source:- https://lokmat.news18.com/maharashtra/symbiosis-universitys-mass-communication-student-commits-suicide-in-hostel-updates-mhsp-445289.html

Related posts

पोलिसांसाठी ‘मोबाइल क्लिनिक !

Vishal Khandagale

येरवडा कारागृहात फरशीने हल्ला : एका कैद्याचा मृत्यू, दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल !

Vishal Khandagale

होमिओपॅथिक क्लिनिकला पुणे महानगरपालिकेचा दणका

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX