Uncategorized

देशात कोरोनाग्रस्त 3,374 च्यावर; 77 जणांचा मृत्यू!

Pune City News:- देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून ती 3 हजार 374 एवढी झाली आहे. त्यामुळे 77 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण 3 हजार 374 रुग्णांपैकी 3030 रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत.
दरम्यान 267 रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. दरम्यान, भारतात 12 तासांमध्ये 302 नव्या रुग्णांची वाढ झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.
राज्यात 10 तासांमध्ये राज्यात नवीन 145 बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 635 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी लोकांच्या राज्यातील 1225 जणांच्या यादीपैकी 1033 जणांशी संपर्क साधला आहे. त्यापैकी 738 जणांना विलगीकरण कक्षात भरती केले आहे.
दरम्यान त्यात 7 जण कोरोनाबाधित असून पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर येथील प्रत्येकी 2, तर हिंगोलीतील एका रुग्णाचा समावेश असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

Related posts

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल चे निलंबन !

Vishal Khandagale

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 29 वर

Vishal Khandagale

महापालिका विषय समिती निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX