Pune City News:- कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे शहराला भाजीपाला पुरवठा करणारे मार्केटयार्ड उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केटयार्डच्या आजूबाजूच्या परिसरात कोरोना विषाणू चे रुग्ण सापडल्यामुळे अनेक परिसर सील करण्यात येत आहे. तसेच कर्फ्यु देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत व्यापार करणे धोक्याचे असल्याचे आडते असोसिएशनच्या सर्व सभासदांनी प्रशासनाला कळवले होते. त्यामुळे परिस्थिती जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केट मधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आणि संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्ड मधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली होती. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे ने शुक्रवार दिनांक 10 एप्रिल पासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि केळीचा घाऊक व्यापार पुढील निर्णय होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जी. देशमुख यांनी सांगितले.
तसेच पुणे शहरातील उप बाजारसमित्या मार्फत पुणे शहाराला लागणर सर्व भाजीपाला इतर सर्व सुरळीत पार पडले
previous post
next post

