Pune City News:- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लॉकडाऊन दरम्यान शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या उपरण्याचाच वापर मास्क म्हणून केला होता आणि ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते.दरम्यान पंतप्रधानांनी या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्यांकडून सूचनाही मागवल्या. मी तुमच्यासाठी 24X7 उपलब्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. या बैठकीत आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या फैलावाचे तपशीलासहीत एक प्रेझेन्टेशनही दिले.
● या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. राज्यात देशातील सर्वाधित 1 हजार 364 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील 97 जणांचा मृत्यू झाला आहे.
● दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ‘परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसल्याने लॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.दिल्लीमध्ये 903 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून शुक्रवारी एकाच दिवशी 183 रुग्ण सापडले. त्यामुळे, दिल्लीतील अनेक भागांना ‘संक्रमित झोन’ म्हणून घोषित केले आहे.

