Pune City News
कोरोनागुन्हे विषयकपुणे

फरासखाना पोलीसांकडून बंगाली सोने कारागिरांना अन्नधान्याचे वाटप !

Pune City News:- कोरोना संसर्गजन्य रोगाचे पार्श्वभुमीवर पुणे शहरामध्ये संचारबंदी लागु करण्यात आलेली असल्याने सोनेचांदीची विक्री करणारे दुकाने ही बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे बंगाली सोने कारागिर यांची परिस्थीती बिकट झालेली आहे. त्यांना आपला उदरनिर्वाह करणे अशक्य झाले असल्याने त्याची दखल घेवुन,श्री.संजय शिंदे,अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर व मा. श्रीमती स्वप्ना गोरे,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच बंगाली असोशिएशनचे अध्यक्ष श्री.सुब्रोतो दास यांचे सहकार्याने आज दि. १०/०४/२०२० रोजी १२० बंगाली सोने कारागिरांना सोन्या मारुती चौक, रविवार पेठ, पुणे येथे

जिवनावश्यक वस्तु व अन्नधान्यांचे १२० पाकीटांचे वाटप करण्यात आले.सदर उपक्रमाचे वेळी मा. श्री. जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन,यशपाल सुर्यवंशी,पोलीस हवालदार समीर सय्यद, यांचेसह बंगाली असोशिएशनचे अध्यक्ष श्री. सुब्रोतो रॉय व त्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

पुणे शहरातील पहिला 400 KW सौर ऊर्जा प्रकल्प कोंढव्यातील थ्री ज्वेल्स अपार्टमेंटमध्ये सुरू

Vishal Khandagale

हरणाच्या शिंगाची तस्करी; दत्तवाडी पोलिसांची कारवाई

Vishal Khandagale

आज 193 वा “गनर्स डे”

Vishal Khandagale

Leave a Comment