Pune City News
राष्ट्रीय

राष्ट्रीय महामार्गांवर उद्यापासून टोलवसुली!

Pune City News:- देशभरात 3 मेपर्यंत टाळेबंदी असून, केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. असे असतानाही आता 20 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी सूचना केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. आता त्यात वाढ करून तो 3 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मात्र, लॉकडाऊन वाढवला असला तरीही, महामार्गांवरील टोलवसुली बंद ठेवण्याचा निर्णय मात्र रद्द केला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व प्रकारच्या जीवनावश्यक माल वाहतुकीला परवानगी दिली आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने चारच दिवसांपूर्वी या मालवाहतुकीला कोणताही अडथळा येऊ न देण्याची सूचना राज्यांना केली आहे. आता या वाहतुकीला टोलवसुलीचा फटका बसणार आहे.

Related posts

देशाच्या सर्वात मोठ्या बैंक डिफॉल्टरांची यादी माहीती अधिकारात उघड!

Vishal Khandagale

आज 193 वा “गनर्स डे”

Vishal Khandagale

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला..भारतासाठी पुढील 30 दिवस महत्त्वाचे !

Vishal Khandagale

Leave a Comment