Pune City News
पुणे

पुणे शहरातील नगरसेविकेला कोरोनाची लागण…!

Pune City News :-पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून त्यातच एका नगरसेविकेला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून समोर आहे.

एका राजकीय पक्षाची नगरसेविका आणि त्यांचा लहान मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी (२९) रोजी तपासणीनंतर पुढे आले आहे.

नगररोड परिसरात राहणाऱ्या या नगरसेविका कोरोना झाल्याने या भागांत प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तपासणी अहवाल येताच नगरसेविकेला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्यावर उपाययोजना केल्या जात असल्या तरी, कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, नगर रस्ता परिसरातील एका नगरसेविकेलाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नगरसेविका महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत पहिल्यादांच निवडून आल्या आहेत.

Related posts

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला..भारतासाठी पुढील 30 दिवस महत्त्वाचे !

Vishal Khandagale

पृथ्वीराज साठे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बढती

Vishal Khandagale

पुणे जिल्हा न्यायालयातील पार्किंग होणार सुटसुटीत

Vishal Khandagale

Leave a Comment