Pune City News
राष्ट्रीय

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कायमचे वर्क फ्रॉम होम..!

Pune City News:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कायमचे वर्क फ्रॉम होम करण्याची घोषणा ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी केली आहे.

जॅक डोर्सी यांनी सकाळी आपल्या कर्मचार्‍यांना ईमेल पाठवत सूचित केले की जोपर्यंत त्यांना योग्य वाटेल तोपर्यंत घरून काम करु शकता.
आम्ही अशा कंपन्यांपैकी एक आहोत ज्यांनी प्रथम वर्क फ्रॉम होम मॉडेल सुरू केले. सप्टेंबरपूर्वी ट्विटरचे कार्यालय सुरू होण्याची शक्यता वाटत नाही.व ट्विटर ही पहिल्या टेक कंपन्यांपैकी एक होती ज्यांनी याआधीच आपल्या ५००० कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करणे अनिवार्य केले.

जर एखाद्या कर्मचाऱ्याला कार्यालयात यायचे असेल तर त्याचे स्वागत असेल परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी घ्यावी लागेल.दरम्यान, ट्विटर, फेसबुक, अल्फाबेट (गूगल) आणि इतरही अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी ही पावले उचलली आहेत.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

Vishal Khandagale

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार !

Vishal Khandagale

गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

Vishal Khandagale

Leave a Comment