Pune City News:- पुणे शहरांत दिवसेंदिवस कोरोना विषाणूबाधीत आकडा वाढत आहे गोरगरिबांना डॉक्टर उपलब्ध होत नाहिये व कोरोना विषाणु बद्दल या गोरगरिब नागरिकांन मधे भिती चे वातावरण निर्माण होत आहे.


तसेच आज स्वर्गीय लतिका ताई साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने स्वर्गीय लतिका ताई साठे युवा फाऊंडेशन व भिमसेना महासंघ.प्रदिपदादा साठे (कार्यअध्यक्ष भिमसेना माथाडी व कामगार जनरल युनियन) व दिपक भाऊ साठे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिमसेना माथाडी व कामगार जनरल युनियन) व आरती ताई साठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत “आरोग्य शिबिर”आंबेडकर नगर येथे राबविण्यात आले

या आरोग्य शिबिरा मध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला या आरोग्य शिबिरासाठी विशेष सहकार्य निलेश आल्हाट (युवक कार्यअध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र RPl A), सीताराम गंगावणे (भीम आर्मी )डाॅक्टर राम गुडगिला,फोर्स मोटर्स व या सर्वांचे स्वर्गीय लतिका ताई साठे युवा फाऊंडेशन च्या वतीने आभार मानण्यात आले

