Pune City News
पुणे

तडीवाला रोडची केंद्रीय पथका कडून पाहणी

Pune city News:- पुणे शहरातील कोरोनाग्रस्थ “हॉट स्पॉट”
असलेल्या ताडीवाला रोड येथील आरोग्य सुविधांबाबत केंद्रीय पथकाने पाहणी केली.व कोरोनाग्रस्थाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकाच्या सदस्यांनी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयात क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या विविध कक्षांना भेट देवून येथील आरोग्य व इतर सुविधांच्या आढावा घेतला.

ताडीवाला रोड परिसरातील लुंबिनी नगर, सिध्दार्थनगर येथील वस्त्यांची पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, साखर आयुक्त सौरभ राव तसेच केंद्रीयपथक प्रमुख केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त उप महासंचालक डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. मानस प्रतिम रॉय तसेच समन्वय डॉ. अरविंद अलोने, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपस्थित होते.

Related posts

मनसेच्या वतिने ‘मी मराठी- माझी स्वाक्षरी मराठी’ उपक्रम

Vishal Khandagale

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना समन्वय समित्यांची स्थापना : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती

Vishal Khandagale

कोरोनाग्रस्तनाच्या सेवेसाठी “माझे तीन महिन्याचे वेतन द्यावे” नगरसेविका श्वेता गलांड़े- खोसे

Vishal Khandagale

Leave a Comment