Pune City News
गुन्हे विषयक

तरुणाचा दगडाने ठेचून खून

पिंपरी परिसरातील थेरगाव हद्दीत एक तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी( दि.५) रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हृषीकेश बालाजी गायकवाड (३०, रा. थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृषीकेश याच्या डोक्यात तसेच इतरत्र दगडाने मारहाण करण्यात आलेली आहे. यामध्ये तो रक्तबंबाळ झाला आहे. नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हृषीकेश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वाकड पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related posts

मंडप व्यासायिकाची गळफास घेऊन आत्महत्या…..

Vishal Khandagale

येरवड्यात किरकोळ वादातून खून

Vishal Khandagale

सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटला होता ; पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई

Vishal Khandagale

Leave a Comment