Pune City News
महाराष्ट्र

पुणे विभागात डॅश बोर्ड विकसित

कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून डॅश बोर्ड स्थापन करण्यात आला आहे.

या डॅश बोर्ड ची सुविधा www. divcommpunecovid. com/ccsbeddashboard या लिंक वर संगणकीय प्रणाली द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

रुग्णालयातील बेड च्या उपलब्धतेची माहिती या डॅश बोर्ड वर वेळोवेळी अद्ययावत करण्याच्या सूचना विभागातील रुग्णालय प्रशासन व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. ही माहिती रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या संस्थांनाही देण्यात येणार आहे, जेणेकरुन बेड उपलब्ध असणाऱ्या नजीकच्या रुग्णालयात रुग्णाला जलदगतीने दाखल करणे शक्य होईल. यामुळे प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही या डॅश बोर्ड सुविधेचा निश्चितच उपयोग होईल.

नागरिकांना डॅश बोर्ड ची माहिती मोबाईल अँप द्वारे पाहता येण्यासाठी काम सुरु आहे. लवकरच ही सुविधा DivCompunebeds या मोबाईल अँपद्वारे देखील एका क्लीक वर पाहता येणे शक्य होणार आहे. यासाठी आय टेक बिझनेस सोल्युशन्स या पुण्यातील कंपनीचे शैलेंद्र फाटक यांनी तांत्रिक काम केले आहे.

Related posts

50 लाखांच्या खंडणीची मागणी!

Vishal Khandagale

केंद्र सरकारने 25 हजार कोटींचे पॅकेज द्यावे – अजित पवार

Vishal Khandagale

“मला राज्यसभेची अपेक्षाच नव्हती” एकनाथ खडसे

Vishal Khandagale

Leave a Comment