Pune City News
महाराष्ट्र

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जणांना कोरोना

PUNE CITY NEWS :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचा स्वीय सहायक, मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक अशा पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

विशेष : मुंबईत आल्यानंतर धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली होती. याचे रिपोर्ट गुरुवारी रात्री आले. यामध्ये मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मंत्री मुंडे सहभागी झाले होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. तेही कोरोनामुक्त झाले आहेत.

Related posts

“विजयस्तंभास अभिवादन” जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Vishal Khandagale

अर्थसंकल्प 2020 : महाआघाडी सरकारचे 1 ले महाबजेट सादर

Vishal Khandagale

“कोरोना” बाबत अफवा पसरवणारी शिक्षिका निलंबित!!

Vishal Khandagale

Leave a Comment