PUNE CITY NEWS :- राज्यातील कंटेन्मेंट झोनचा कालावधी २८ दिवसांवरून १४ दिवसांवर आणावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यात बैठक झाली आहे.
या बैठकीत पोलीस, महापालिका प्रशासनावरील भार कमी करण्यासाठी कंटेन्मेट झोनच्या कालावधीवर चर्चा करण्यात आली.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले :
▪️ महाराष्ट्रात कंटेन्मेंट झोन मोठ्या प्रमाणात असून विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या कंटेन्मेंट झोनवर लक्ष देऊन तेथील मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.
▪️ महाराष्ट्रात आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्स वाढवण्याची गरज असून एकाही रुग्णाला माघारी पाठवू नये.
दरम्यान, मागणी मान्य होण्याची अपेक्षा करून पोलिसांवरील भार कमी होण्यासाठी केंद्राने लवकरच सुधारित नियमावली जारी करावी अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे

