जगात सर्वाधिक वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपची पेमेंट सर्व्हिस ब्राझीलमध्ये अधिकृतरित्या सुरू झाली आहे.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने एका पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.
मार्क झुकरबर्गने सांगितले की… :
● आज आम्ही ब्राझीलमध्ये व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिसची सुरुवात करत आहोत.
● आम्ही पैसे पाठवणे आणि स्विकारण्याच्या प्रक्रियेला फोटो पाठवण्याऐवढे सोपे बनवत आहोत.
● लवकरच छोट्या व्यापाऱ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे खरेदी-विक्रीची सुविधा देणार आहोत.
● व्हॉट्सअॅप पेमेंटसाठी ब्राझीलच्या स्थानिक बँकांशी भागीदारी करण्यात आली आहे.
● व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा सुरू करण्यात आलेला ब्राझील हा पहिला देश आहे.
● त्यांनी भारतासह इतर देशांमध्ये देखील ही सेवा लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.

