Pune City News
पिपरी चिंचवड

शुल्क मागणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

PUNE CITY NEWS :- पिंपरी चिंचवड शहरात शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून पालकांकडून शुल्क भरणे, शुल्क वाढ तसेच शालेय साहित्य खरेदीविषयक सक्ती करणे याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत.

अशा तक्रारी येणार्‍या शाळांवर बालकांच्या मोफत शिक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचनेचे पत्र प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी शाळांना पाठविले आहे.

सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे, अशी परिस्थिती असताना काही संस्था, शाळा, विद्यार्थी व पालकांना शुल्क भरण्यासाठी फोन, एसएमएस, मेल पाठवून सक्ती केली जात आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. शाळांनी जोपर्यंत विद्यार्थी शाळेत येत नाही. तोपर्यंत शुल्क वसुलीचा तगादा लावू नये, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही जर त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करुन त्याप्रमाणे योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे.

तसेच टप्याटप्याने शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा आशयाचे परिपत्रकही सर्व शाळांना देण्यात आले आहे. मात्र, तरीही शाळा शासनाच्या आदेशाचे पालन करत नाही असे दिसून येत आहे. शहरातील ज्या शाळा आदेशाचे पालन करणार नाहीत त्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

Related posts

‘चला हवा येऊ द्या’ च्या डोक्यात घुसली हवा

Vishal Khandagale

कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी निधी; अजित पवार

Vishal Khandagale

वडापावच्या गाडीवरून काळेवाडी येथे तरुणाचा खून

Vishal Khandagale

Leave a Comment