Pune City News
गुन्हे विषयक

दीड कोटींच्या फसवणूकप्रकरणी बंडखोर भाजप नेत्याला पुण्यात अटक

PUNE CITY NEWS :- दीड कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक आणि भाजप नेते रत्नाकर ज्ञानदेव पवार आणि अशोक तूळशीराम अहिरे यांना पुणे कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यामध्ये व्यवसायात एकत्र भागीदारी करून मोठा मोबदला देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या मोहद्दीस महंमद फारुख बखला( वय 36) यांनी फिर्याद दिली होती.

त्यानंतर पोलिसांनी रत्नाकर पवार यांच्यासह इतर साथीदारांवर कारवाई केली आहे. याप्रकरणात काही जणांना अगोदरच अटक करण्यात आली आहे.

रत्नाकर पवार हे नाशिकमधील भाजपचे नेते आहेत. त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत निवडणूक लढवली होती.

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता. त्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर कोंढवा पोलिसांना त्यांना अटक करण्यास यश आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

रत्नाकर पवार यांना २७ पर्यंत पोलीस कोठडी

नफा मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकांची १कोटी ६४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नाशिक येथील भाजप नेते रत्नाकर पवार यांना न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली आहे़ याप्रकरणी मोहद्दीस फारुख बखला (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे़.

या प्रकरणात रत्नाकर पवार व इतरांनी बखला यांना वेगवेगळी आश्वासने देऊन कंपनीत भागीदारी देत असल्याचे सांगून त्यांच्याकडून विविध प्रकल्पात गुंतवणुक करण्यासाठी तसेच कामगारांचे पगार व इतर कामांसाठी वेळोवेळी १ कोटी ६४ हजार ३८७ रुपये घेतले.

त्यापैकी बखला यांनी पवार आणि अहिरे यांना ६३ लाख रुपये दिले होते. त्यानंतर पवार व त्यांच्या साथीदारांनी त्या प्रकल्पात पैसे न वापरता त्याचा उपयोग स्वत:साठी केला.

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नाकर पवार यांनी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली. परंतु, सर्व ठिकाणी त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती.

Related posts

पुणे शहरात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त..

Vishal Khandagale

विमाननगर मध्ये सात कोटीं रुपयांच्या बनावट नोटा जप्त !

Vishal Khandagale

अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीना क्युआर कोड ची सक्ती करु नका ! : पुणे शहर उपआयुक्त मा.संभाजी कदम यांचे आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment