PUNE CITY NEWS :- राज्यामध्ये असणारी कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी राज्य सरकार कोरोनाच्या चाचण्या कमी करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पुण्यातील रुग्णालयांना देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कोविड रुग्णालयांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत.
त्यात कोरोना चाचण्या वाढवण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारकडून तसे होतांना दिसत नाही.
राज्यात दिवसाला ३८ हजार कोरोनाच्या चाचण्या करण्याची क्षमता आहे. मात्र, फक्त १४ हजार चाचण्याचं होत आहेत हे धोकादायक आहे.
कंटेन्मेंट झोनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असताना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. दिल्लीत करोनाच्या चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवले आहे.
पण मुंबईत का कमी केले?’ असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

