पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

बकरी ईद साजरी करण्याबाबत निर्देश जारी

PUNE CITY NEWS :- राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर बकरी ईद बाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला असून बकरी ईद साजरी करण्याबाबत नवी गाईडलाईन जाहीर केली आहे.

गाईडलाईन :

● ऑनलाईन द्वारे बकरे खरेदी करा

● बकरे खरेदी करण्यासाठी बाजार भरणार नाही

● कुर्बानीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी करू नये

● प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी आपल्या नावानं ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करून घ्यावी

● कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याबाबत काळजी घ्यावी

● मुंबईबाहेर कुर्बानी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

● राहत्या घरीच बकरी ईदची नमाझ अदा करावी

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद संदर्भात गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद घरीच साजरी करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Related posts

‘राजनाथ सिंग यांचे अनुभवाचे बोल’

Vishal Khandagale

बाणेर मधील नागरिकांनी विजेच्या खांबांवर पेटवल्या मशाली

Vishal Khandagale

संचारबंदी चे आदेश: पुणे पोलीस

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.