Pune City News:- कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या ३० हजाराहून जास्त झालेली आहे. भविष्यात ही संख्या १ लाखाच्या घरात अथवा त्यापेक्षा जास्त होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ससून सर्वोपचार रूग्णालय व पुणे महानगरपालिका उभारलेले कोविड सेंटरमध्ये रूग्ण दाखल होत असून पुणे महानगरपालिकेने शहरातील बहुतांशी खाजगी रूग्णालयांबरोबर करार केले असून तेथील कोरोना बाधितांवर उपचार केले जातात. पुण्यातील अनेक रूग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची कमतरता आहे, ही वस्तुस्थिती आहे. पावसाळयाचे दिवस चालू झाले असून पावसाळयामध्ये व्हायरल इनफेक्शनचे प्रमाण वाढत असते. कोरोनाचा संसर्ग देशभरात वाढत असून पुणे शहरातील आय.एम.ए. डॉक्टर, इंटेसिव्हिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, ज्येष्ठ चिकित्सक यांचेशी चर्चा कोरोना व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, तपासणीसाठी व्हॅन व इतर सुविधा याबाबत उपाय योजना तातडीने कराव्यात. पुण्यातील अनेक रूग्णालयांकडून शासनाच्या निर्देशांचे पालन होत नाही असे निदर्शनास येत असून (उदा.रूग्णालयामध्ये दाखल करणेस नकार देणे) यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यु होत आहे.

रूग्णालये ही रूग्णांवर उपचार करून त्यांना बरे करणेसाठी असतात. जर व्हेंटिलेटरची व ऑक्सिजन बेड याची कमतरता असेल तर रूग्णालयांनी इतर रूग्णालयांशी संपर्क करून आयसीयु बेड उपलब्ध करणेबाबत दक्षता घेतली पाहिजे. सायंकाळच्या वेळेनंतर अनेक रूग्णालयांकडून गंभीर रूग्णांना प्रवेश देणेबाबत टाळाटाळ केली जाते असे निदर्शनास येत आहे. (उदा.रास्ता पेठ येथील मेघा शर्मा, वडगाव शेरी येथील तानाजी दुधाने व डॉ.पी.लक्ष्मी नरसिंह निवृत्त शास्त्रज्ञ) या नागरिकांना वेळेत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड याची उपलब्धता न झाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला असल्याचे कळत असून सदर प्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे. ससून रूग्णालयांमध्ये कोरोनाची लक्षणे असूनही रूग्णांना कोविडच्या वॉर्डमध्ये दाखल केले जात नाही, कोरोना तपासणीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहिली जाते. तोपर्यंत औषधोपचार दिले जात नाहीत.
वरील सर्व बाबी पाहता पुण्यातील सर्व रूग्णालयांमध्ये हेल्प डेस्क तयार करण्यात यावा.
त्याठिकाणी पुणे महानगरपालिका अधिकारी नेमून आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा, उपलब्ध खाटांची संख्या याबाबत पूर्णपणे माहिती ठेवण्यात यावी. जेणेकरून पुण्यातील एकही नागरिकाचा भविष्यात रूग्णालयात जागा मिळाली नाही, उपचार मिळाले नाहीत यामुळे मत्य होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल. या अनुषंगाने आपले स्तरावरून तातडीने पुढील कार्यवाही करण्यात यावी.
सोबत नगरसेवक अरविंद शिंदे, अजित दरेकर, काँग्रेस चे युवा नेते मेहबूब नदाफ, सुजित यादव उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभाग

