Pune City News
महाराष्ट्र

मुंबईच्या फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळला

मुंबईतील फोर्ट परिसरातील इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

फोर्टमधील पाच मजली भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती पावणे चारच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली.

त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. सध्याच्या घडीला अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण दबल्याची माहिती प्रत्यक्षदर्शांनी दिली. त्यांना बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलानं सुरू केलं आहे.

या ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Related posts

पुणे परिसरातील रेल्वे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘Pune Area Decongestion Plan’ जाहीर

Vishal Khandagale

परदेशवारी नाही तरीही “करोना” लागणची लक्षणे !

Vishal Khandagale

कोरोना: 14 दिवस विलंगिकरनात : 2500 संशयितांची यादी तयार !

Vishal Khandagale

Leave a Comment