Pune City News
Uncategorizedपुणे

पुण्याला केंद्राकडून मिळणार १०० व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय स्टाफ

Pune City News:- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्याच्या कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीला मंत्रालयातील उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या दालनातून मी सहभागी झालो.

बैठकीत खालील प्रमाणे चर्चा व सूचना करण्यात आल्या.

१) आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचा स्टाफ लवकरात लवकर ससून आणि पुणे महापालिकेच्या हॉस्पिटलसाठी उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झाली.

२) कंटेन्मेंट झोनच्या बाबतीत अधिक कडक कारवाई झाली पाहिजे. वेळ पडली तर एसआरपीएफची मदत घ्यावी, अशी सूचना जावडेकर यांनी केली.

३) सध्याची परिस्थिती पाहाता शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटनांचा सहभाग वाढवण्यात यावा, याबाबत सूचना जावडेकर यांनी केली

४) शहरातील आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेडची कमतरता पाहता लवकरात लवकर १०० व्हेंटिलेटर पुणे शहराला देण्याचे मान्य झाले. त्यातील काही वेंटीलेटर टप्प्याटप्प्याने यायला सुरुवात होईल. तर काही वेंटिलेटर आज पुण्यात पोहोचतील.

५) पुणे महापालिकेने साडेचार महिन्यात कोरोनाच्या काळात अडीचशे कोटींपेक्षा रुपये खर्च केले आहेत, परंतु भविष्यात पुणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता केंद्रशासन व राज्य शासनाने पुणे शहराच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी महापौरांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला. एकूणच राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यात चांगला समन्वय बैठकीत राहिला.

‘गरजेच्या वेळी केंद्र सरकारने व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करण्यासंदर्भात पावले उचलल्याचे पुण्याला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री श्री. जावडेकरजींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी तातडीनं करण्यात येईल. सामूहिक प्रयत्नांना नक्कीच यश येईल आणि पुणे शहर या संकटातून बाहेर येईल, हा विश्वास आहे.’

Related posts

Containment Zone मधील रस्ते पूर्ण सील !

Vishal Khandagale

रस्ता सुरक्षेच्या प्रसाराकरीता १५ सप्टेंबर रोजी वेबीनारद्वारे चर्चासत्राचे आयोजन

Vishal Khandagale

जम्बो केअर सेंटर झाले तरीही वैद्यकीय सुविधांची वानवाच -आमदार सिद्धार्थ शिरोळे

Vishal Khandagale

Leave a Comment