Pune City News
पुणे

रिक्षा पंचायतीचे विधान भवनाबाहेर “जागर उपोषण”

राज्य सरकारचे रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या वतीने पुण्यातील विधान भवन बाहेर एक दिवसाचे “जागर उपोषण” करण्यात आले.

सध्या रिक्षा चालकांची असलेली आर्थिक परिस्थिती चा राज्य सरकारने विचार करावा, तसेच लॉक डाऊनच्या काळात रिक्षा बंद असल्यामुळे रिक्षा चालकांना मानधन म्हणून १४,००० रुपये मिळावे, तसेच रिक्षा चालकांचे थकीत हप्ते राज्य शासनाने भरावे, हप्त्यांसाठी फायनान्स कंपन्याकडून होणारा त्रास बंद व्हावा, यांसह आदी मागण्या रिक्षा चालकांकडून करण्यात येत होत्या.

मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष करत आहे, सध्या अधिवेशन सुरू असल्याने निदान या काळात तरी प्रशासनाचे लक्ष जावे, यासाठी आज विधान भवनासमोर हे जागर उपोषण करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी सांगितले.

Related posts

कोरोना : ४ नवीन रुग्ण आढळले!

Vishal Khandagale

वडापावच्या गाडीवरून काळेवाडी येथे तरुणाचा खून

Vishal Khandagale

कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात १ कोटी ८५ लाखांची रोकड जप्त !

Vishal Khandagale

Leave a Comment