Pune City News
पुणे

हौशी नगरसेवकांचे खेळ थांबवा: आम आदमी पार्टी निवेदन

PUNE CITY NEWS :- भारतात सर्वात जास्त कोरोना संसर्ग झालेल्या शहरांमध्ये पुणे शहराचा समावेश आहे . सध्याच्या आपत्तीच्या स्थितीत आरोग्य सुविधांचा अभाव आपल्याला जाणवतो आहे तसेच निधीचा तुटवडा असल्याचे समोर येते आहे . भाजपाचे नगरसेवक  यांच्या हट्टासाठी सॅलिबसरी पार्क परिसरातील एका उद्यानासाठी तब्बल १४ लाख रुपये किमतीचे एक झाड खरेदी करण्यात येणार आहे. या झाडाची वाहतूक आणि त्याचे रोपण, याचा खर्च गृहीत धरून, त्याची किंमत १८ लाख रुपयांपर्यंत असेल. अशी ४ ते १४ लाख रुपये किमतीची ६५ झाडे महापालिका खरेदी करणार आहे. या सर्वासाठी अडीच ते साडेतीन कोटी खर्च करण्याचा महानगरपालिकेचा विचार आहे. आम आदमी पार्टीने या पूर्वी सुद्धा याला विरोध केला होता. कोरोना मुळे आजच्या गंभीर आर्थिक संकटाच्या काळात आपण तातडीने या निविदा थांबवून आरोग्य , शिक्षण, दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी कार्यक्रम अश्या कामांसाठी हा निधी वापरावा अशी आम आदमी पार्टी आग्रहाची विनंती करत आहे.
चित्र विचित्र आकाराच्या झाडांचे आकर्षण महानगर पालिकेस का पडले हा मोठा गहन प्रश्न आहे. येथे हॉस्पिटल मध्ये चांगल्या सुविधा देणे महानगर पालिकेस जमत नसताना हा बालिश हट्ट का पुरवला जातोय ? या मागे कुणाचे हात ओले झाले आहेत ? असा प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला असून कल्पनाशक्ती आणि जनहितासाठीच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे विविध प्रकारचे दिव्याचे खांब , सतत नवे नवे बस थांबे, फुटपाथ वर पेव्हिंग ब्लोक अश्या बाबींमध्ये सतत रस दाखवणाऱ्या प्रस्थापित नगरसेवकांना आता जनता दणका देईल.
वस्तुतः या प्रकारच्या टोपीयरी बागा म्हणजे विविध आकाराच्या वृक्ष , झाडांच्या बागा हा व्यावसायिक क्लब , फार्म हाउस , पार्टी प्लॉट या ठिकाणच्या व्यवसायवृद्धीसाठी वापर केला जातो. याची देखभाल खर्चिक व कौशल्याचे काम असते. या पूर्वी जनतेच्या पैशातून पुण्यात आबा बागुल यांच्या आग्रहासाठी फुलपाखरू गार्डन तर मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या हौशेसाठी पेंग्विन आणले गेले होते. मध्यंतरी जलपर्णी मधून पैसा कमवण्याचा प्रयत्न झाला. नगरसेवकांच्या हट्टापायी आणि प्रशासनाच्या फायद्यासाठीचे हे भ्रष्टाचाराचे उपदयाप थांबवावेत अशी मागणी आम आदमी पार्टी ने केली आहे

Related posts

लोककलावंतांचे शासन दरबारीआंदोलन संपन्न

Vishal Khandagale

“सॅनिटायझर्स” व मस्क च्या काळा बाजारा करणरया वर पोलीसांची कार्यवाही

Vishal Khandagale

चित्रपटानंतर आता नाटक सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्म वर…

Vishal Khandagale

Leave a Comment