PUNE CITY NEWS :- खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग ९ हजार ४१६ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे.
चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाने पुन्हा जोर धरलेला असून आज दिवसभरात हा विसर्ग वाढवलाही जाऊ शकतो. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
खडकवासला धरण प्रकल्प पाणीसाठा :-
खडकवासला : १.९७ टीएमसी/१००टक्के,
पानशेत : १०.६५ टीएमसी/१००टक्के,
वरसगाव : ११.९६, टीएमसी/९३.२७ टक्के,
टेमघर : २.८५ टीएमसी/७६.७७टक्के
एकूण पाणीसाठा : २७.४२ टीएमसी/९४.०८ टक्के.
गेल्या वर्षी आजच्या दिवशी : २९.०५ टीएमसी/९९.६६टक्के पाणीसाठा झाला होता.
याशिवाय मुळशी धरणाच्या सांडव्यातून विसर्ग ७३२५ क्युसेक्स करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले असून धरण पातळीत वाढ होत आहे.
त्यामुळे स. १०:०० वा विसर्गात १०,००० ते १२,००० क्युसेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल,अशी माहिती धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिली आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

