PUNE CITY NEWS :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक फिरत्या हौदांवर खोटा आक्षेप घेण्याचा आणि पर्यायाने वस्तुस्थिती समजून न घेता शहराची बदनामी करण्याचा प्रकार ओंगळवाणा आहे. खोटे आरोप करुन गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना पुणेकर कधीही माफ करणार नाही असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
हे आक्षेप घेण्यात आलेले हौद हे गणेश विसर्जनासाठीचेच आहेत. गेल्या वर्षीही ते वापरण्यात आले होते. केवळ माती आणि निर्माल्य दिसलं म्हणून कचऱ्याचे कंटेनर आहेत, असा दावा करणे अस्वस्थ करणारे आहे. जर कंटेनर कचऱ्याचा असता तर त्याला खाली पाण्याचं आऊटलेट कसं असेल? एवढं बेसिकही न कळावं?
माध्यमांच्या कॅमेरासमोर सर्व वस्तुस्थिती समोर आणली आहे. त्यामुळे कचऱ्याचे कंटेनर आणि विसर्जन हौद याचे दोन्ही प्रकार समोर दाखवले. आता यापुढे असे गलिच्छ आरोप होणार नाहीत, यासाठी बाप्पाकडेच प्रार्थना करुयात. असेही महापौर मोहोळ यांनी विरोधकांना सांगितले.

