पुणे

माजी महापौर दत्तात्रय एकबोटे यांचे कोरोनामुळे निधन

PUNE CITY NEWS :- पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद एकबोटे ( वय ८४) यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. गुरुवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

एकबोटे हे समाजवादी विचारसरणीचे व्यक्तिमत्व होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

गोल्फ क्लब आणि विडी कामगारांसाठी त्यांनी खराडी परिसरात घरे उभारली आहेत. त्यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. महाराणा प्रताप उद्यानात त्यांनी एस एम जोशी यांचा प्रणाकृती पुतळा उभारला होता.
यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू असा परिवार आहे. गरिबांचे नेते म्हणून त्यांची पुणेकरांना ओळख आहे.

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

Vishal Khandagale

‘वंचित’च्या शिष्टमंडळाने घेतली साखर आयुक्तांची भेट

Vishal Khandagale

कोरोना : प्रतिबंधासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX