पुणे

वडगावशेरी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर पार !

वडगावशेरी राष्ट्रवादी काँग्रेस व शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिना निमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते . यामध्ये महिलांसाठी मोफत “स्तन कॅन्सर” तपासणी करण्यात आली . शिबिराचे आयोजन वडगाव शेरी राष्ट्रवादी महिला काँग्रेस विधानसभेच्या अध्यक्षा निताताई गलांडे व  माजी शिक्षण मंडळ सदस्य राजेंद्र काटे यांनी केले होते. व मा. सुनील जाधव यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आले

तसेच वडगावशेरी विधानसभेच्या कार्याध्यक्ष पूजाताई काटकर व लीलाताई सोनवणे (उपाध्यक्ष सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान) यांनी नियोजना मध्ये मोठा सहभाग दर्शविला महिलांनी आरोग्या  बद्दलची चिकित्सा जाणून शिबिराला छान प्रतिसाद दिला.

ह्यावेळी मंदाकिनी चांधारे (सरचिटणीस ) ,अलका ढगे ( येरवडा प्रभाग अध्यक्ष) यादेखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या तसेच बेबी रेवणे, किर्तीताई आखाडे भारती रिसर्च सेन्टर समतादूत,गायकवाड दादा, झेंडे दादा,जयदीप चांदणे व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे  कार्यकर्ते उपस्थित होते .प्रयास संस्थेचे डॉक्टर तृप्ती धारपवार, रुपाली गायकवाड, माया भिलारे, सिद्धी मुलक,यांनी महिलांना स्तन कॅन्सर संदर्भात महिलांना सर्व माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन केले.

Related posts

माथाडी कामगारांना १० हजारांची उचल !

Vishal Khandagale

अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ‘इडी’चा छापा

Vishal Khandagale

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ संजीवन समाधी सोहळा…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX