पिपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड येथील कोरोनास्थितीचा शरद पवार यांनी घेतला आढावा

PUNE CITY NEWS :- पिंपरी-चिंचवड येथील वाढत्या कोविड रुग्णसंख्येची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी तेथील मनपा कार्यालयातील डिझॅस्टर मॅनेजमेंट वॉररुमला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक भेट दिली.

यावेळी पिंपरी चिंचवड येथील कोरोना स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर नेहरू नगर येथे उभारण्यात आलेल्या आण्णा साहेब मगर स्टेडियमवर उभारलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तसेच आयुक्तांकडून सविस्तर आढावा घेतला.

गरीब रुग्णांसाठी ५० रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याप्रसंगी सुपूर्द केली. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

Related posts

पुणे शहर व पिंपरी चिंचवड ‘ला’ जोडणारे पूल बंद !

Vishal Khandagale

पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द!

Vishal Khandagale

कोरोना चा संसर्ग रोखण्यास “पुणे जिल्ह्यात सनियंत्रण आधीकारयाची नेमणूक”

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX