Pune City News
महाराष्ट्र

मंदिरं बंद का ?; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

raj thakre

महाराष्ट्रात अनलॉक 4.0 मध्ये ठाकरे सरकारनं काही सवलती देत हॉटेल्स आणि मॉल खुली करण्याची परवानगी दिली आहे.

👉 मात्र अद्याप मंदिरांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून सरकारवर टीका केली जात आहे.

🚩 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची कानउघडणी केली आहे.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं :

▪️ सध्या राज्य सरकारचं काही बाबतीतील धोरण शैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे.

▪️ ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये.

▪️ तसेच, ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत.

▪️ सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का?

▪️ कोरोनामुळे जेंव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेंव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं.

▪️ पण आज जेंव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकं महाराष्ट्रातच देवळं का बंद ठेवली जात आहेत?

▪️ जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या.

Related posts

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात !

Vishal Khandagale

बिडीचे बदलणार नाव : साबळे आणि वाघिरे कंपनीचा निर्णय

Vishal Khandagale

बांधकाम कामगारांना अर्थ सहाय्यासाठी दस्तावेजाची आवश्यकता नाही !

Vishal Khandagale

Leave a Comment