Pune City News
महाराष्ट्र

आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे पावसाळी अधिवेशन आजपासून दोन दिवस घेण्यात येत आहे.

आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजली.

यावेळी मात्र सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

कोरोनाची लागण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत. हे अधिवेशन अध्यक्षांच्या अनुपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

फेस शील्ड देखील बंधनकारक केले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहापानाचा कार्यक्रमदेखील रद्द केला आहे.

Related posts

आयुक्तांच पुणेकरांना आवाहन

Vishal Khandagale

सहा दिवसांत पेट्रोल ‘एवढे’ महागले !

Vishal Khandagale

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी सर्वांसाठी प्रेरणादायी; उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment