Pune City News
पुणे

वाघोली परिसरात सहा दिवसांचा जनता कर्फ्यु

हवेली तालुक्यातील वाघोली परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाघोली ग्रामपंचायतीने दि.१२ते २७ सप्टेंबरपर्यंत “जनता कर्फ्यु” पाळण्याचे आवाहन केले आहे.

वाघोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी यांची प्रशासकीय यंत्रणा जनता कर्फ्यूचे पालन करण्याबाबत सज्ज झाली आहे. संपूर्ण वाघोली गावांमध्ये कर्मचारी, पोलिसांच्या, मदतीने कारवाई करणार आहेत. मुख्य महामार्गावर वाहतूक मात्र नेहमी प्रमाणेच सुरू राहणार आहे. तरी वाघोलीतील नागरिकांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

जनता कर्फ्यूला काहींचा विरोध वाघोली कोरोना विषाणू नियंत्रण समितीच्या वतीने १२ ते १७ सप्टेंबरपर्यंत लागू केलेल्या जनता कर्फ्यूला ट्विटर, टेलिग्राम, व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

Related posts

सूर्यदत्ता’ देणार १०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Vishal Khandagale

विमाननगर मध्ये भामा-आसखेड चे पाणी दाखल.

Vishal Khandagale

पेशव्यांच्या टांकसाळीच्या जागेतील गोपालकृष्ण मंदिराचा होणार जीर्णोद्धार 

Vishal Khandagale

Leave a Comment