Pune City News
महाराष्ट्र

राज्यातील 6 जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा

rain

येत्या 24 तासांत राज्याला रेड अलर्ट देण्यात आला असून कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाची माहिती : आज 22 सप्टेंबरला रायगड, सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्गातही अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुसळधार : पुणे, कोल्हापूर व सातारा येथे आजचा दिवस अति मुसळधार पावसाचा असणार आहे. शिवाय पालघर, मुंबई, ठाणे येथे आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

रिमझिम : राज्यातील इतर जिल्ह्यातही कमी-जास्त प्रमाणात पावसाची रिमझिम सुरू असणार आहे.

येत्या 24 तासांमध्ये दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पुण्यासह राज्यभरात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे.

Related posts

‘या’ विभागाच्या ‘सीईटी’ परीक्षा पुढे ढकलल्या

Vishal Khandagale

अंतिमसत्राच्या परीक्षा रद्द करण्याविषयी युजीसीसोबत पत्रव्यवहार सुरू – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Vishal Khandagale

अभिनेते जयराम कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

Vishal Khandagale

Leave a Comment