Pune City News
गुन्हे विषयकपुणे

दीपक मारटकर खुनप्रकरणी तीन संशयित ताब्यात; आठ जणांवर गुन्हा

पुणे- प्रतिनिधी :-  शिवसेनेचे युवा पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तीन संशयिताना ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी एका महिलेसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनानंतर या प्रकरणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दीपक मारटकर (वय ३०) यांचे यांचे मेव्हणे राहुल भगवान आलमखाने (वय ४३, रा.
गवळी आळी, विजयानंद चित्रपटगृहाजवळ, बुधवार पेठ) यांनी या फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ, सनी कोलते, संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल श्रीनिवास रागीर यांच्यासह आणखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक यांचे वडील विजय मारटकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. एक महिन्यापुर्वीच त्यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. विजय मारटकर यांनी मागील महापालिका निवडणुकीत बुधवार पेठ परिसरातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती.

त्यावेळी बहुजन समाज पक्षाकडून अश्विनी कांबळे या परिसरातून निवडणूक लढविली होती. निवडणुकीच्या काळातच कांबळे व मारटकर यांच्यात वाद झाला होता. त्याचवेळी संशयित आरोपी महेंद्र सराफ याच्याबरोबरही विजय मारटकर यांचा वाद झाला.

काही दिवसांपूर्वीच संशयित आरोपींनी दीपक मारटकर यांना धमकाविले देखील होते. त्यामुळे याबाबत चार दिवसांपूर्वी दीपक मारटकर यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात पोलिसांना माहिती दिली होती. त्यावरून हा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Related posts

घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . – आमदार सुनिल कांबळे

Vishal Khandagale

सीरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग

Vishal Khandagale

कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग: ८०० पेक्षा अधिक दुकाने जळून खाक

Vishal Khandagale

Leave a Comment