Pune City News
पुणे

जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम

जेईई ऍडव्हान्स -२०२० परीक्षेचा निकाल आज( सोमवारी) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये पुण्याच्या चिराग फलोर याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या परीक्षेसाठी एकूण १ लाख ५० हजार ८३८ विद्यार्थी बसले होते. पेपर १ आणि २ साठी ४३ हजार २०४ विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झाले होते.

चिराग हा या परीक्षेत कॉमन रँक लिस्टमध्ये टॉपर आला आहे. त्याने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवले आहेत. तर आयआयटी रुरकी झोनमधील कनिष्क मित्तल ही रँक लिस्टमधील १७व्या क्रमांकासह विद्यार्थिनींमध्ये अववल आली आहे.

गेल्यावर्षीही जेईई परीक्षेत महाराष्ट्रामधलाच टॉपर होता. त्यानेही ३७१पैकी ३४६ गुण मिळवले होते.

Related posts

गणेश विसर्जन २०२५ साठी पुणे शहर वाहतूक शाखेचे नियोजन

Vishal Khandagale

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आता हजार रुपये दंड

Vishal Khandagale

पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाची महत्त्वाची सूचना

Vishal Khandagale

Leave a Comment