Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

महाराष्ट्रात “भाजप” कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पुढील काळात भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

सध्या सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष कायमच विरोधी पक्षात राहतील, असे स्पष्ट करीत भाजप कोणत्याही पक्षाशी महाराष्ट्रात युती करणार नाही, असे संकेत नड्डा यांनी दिले.

नड्डा यांनी भाजपच्या नवनियुक्त प्रदेश कार्य समिती व पदाधिकारी बैठकीत बोलताना भाजप व अन्य पक्षांमधील कामकाज पद्धतीतील फरक सांगितला.

भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असलेल्यांना पदे मिळत नाहीत, त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन करून मिळतात, असे सांगितले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने स्वामिनाथन समितीच्या शिफारशींबाबत काहीच केले नाही.

धैर्य दाखवून पंतप्रधान मोदी यांनी निर्णय घेतले आणि शेतकऱ्यांना निर्बंधांमधून मुक्त केल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले

Related posts

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी केल्या अनेक मोठ्या घोषणा

Vishal Khandagale

“काळजी नसावी” शरद पवार

Vishal Khandagale

NCB उपसंचालकांना कोरोना; दीपिकासह इतर अभिनेत्रींची केली होती चौकशी

Vishal Khandagale

Leave a Comment