Pune City News
राष्ट्रीय

सलग आठव्यांदा भारताची UNSC च्या अस्थायी सदस्यपदी निवड

भारताची आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे.

बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली. 2021-22 या कालावधीसाठी भारत आशिया आणि पॅसिफिक प्रवर्गातून अस्थायी जागेसाठी उमेदवार होता.

आशिया-पॅसिफिक गटाने भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. यामध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यासह 55 सदस्यांचा सामावेश होता.

ज्यामुळे भारताची निवड बिनविरोध झाली. कॅनडाला मात्र UNSC मध्ये स्थान मिळू शकलं नाही.

2020-2022 दोन वर्षासाठी भारताची निवड झाल्याचा आनंद आहे.संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे अशी प्रतिक्रिया UNSCमधील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी दिली आहे.

Related posts

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर!

Vishal Khandagale

टाळ्या, दिव्यांनी कोरोना पळणार नाही; राहुल गांधी

Vishal Khandagale

देशाच्या सर्वात मोठ्या बैंक डिफॉल्टरांची यादी माहीती अधिकारात उघड!

Vishal Khandagale

Leave a Comment