Pune City News
पुणे

महापालिकेच्या सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची नियुक्ती !

पुणे महागरपालिकेच्या सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेच्या इतिहास प्रथमच एका स्वीकृत नगरसेवकाची सभागृह नेते पदी निवड करण्यात आली आहे.

आज शनिवारी( दि.११) रोजी धीरज घाटे यांनी गणेश बिडकर यांच्याकडे पदभार सोपवला.

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिडकर यांचा २०१७ च्या पालिका निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवकाची जबाबदारी दिली होती. मात्र त्यावेळी देखील मोठा गोंधळ झाला होता.

यावेळी गणेश बिडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भाजपला पुणेकरांनी भरभरून दिले आहे. त्याबदल्यात पुणेकरांसाठी पुढील ५० वर्षांचे व्हिजन ठेवून समान पाणी पुरवठा योजनांसारख्या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणार आहोत. समस्यामुक्त पुणे करण्याचे वचन आम्ही पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Related posts

वडगाव शेरी “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

कोरोना : उपायांसाठी 50 लाख रुपयांचा निधी : खासदार गिरीष बापट

Vishal Khandagale

सुवर्णयुग सहकारी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता ११ लाख रुपयांची मदत

Vishal Khandagale

Leave a Comment