Pune City News
पुणे

पेशव्यांच्या टांकसाळीच्या जागेतील गोपालकृष्ण मंदिराचा होणार जीर्णोद्धार 

दस्तुरखुद्द पेशव्यांचे सावकार असणाऱ्या दुर्लभशेठ यांच्या मालकीच्या जागेत असलेली टांकसाळनंतर तेथील गोपाळ कृष्ण मंदिरासह ‘समस्त बाराजाती गुजराती महाजन’ संस्थेच्या ताब्यात आल्यानंतर अनेक दशकांचा अडचणींच्या जंजाळातून जाऊन जीर्णोद्धाराच्या टप्प्यावर पोहोचली आहे.

पुण्याच्या महागड्या लक्ष्मी रस्त्यावरील या प्रशस्त जागेत असलेल्या ऐतिहासिक मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. त्या मंदिराचा भूमिपूजन समारंभ (दि.१७) रोजी समारंभ पार पडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ज्योतिप्रकाश सराफ, शोभना सराफ यांच्या हस्ते हा भूमिपूजन समारंभ पार पडला.

पेशव्यांनी दुर्लभशेठ यांना व्यापारासाठी पुण्यात पाचारण केले होते. या जागेतून व्यापार करीत असत. पुढे पेशव्यांची टांकसाळ या जागेत उभी राहिली. २०० वर्षाचा इतिहास असलेली ही वास्तू आणि जागा भाडेकरू आणि वहिवाटीच्या जंजाळात अडकली होती.

कोर्ट, कचेऱ्या, तक्रारी, नोटिसा परिसरातील अनेकांचा त्रास अशा चक्रव्यूहातून जात ट्रस्टला अखेर जीर्णोद्धाराचा संकल्प मार्गी लावता आला आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष ज्योतिप्रकाश सराफ यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्त मंडळाने त्यासाठी परिश्रम घेतले. दोनशे वर्षातील या मंदिराचा हा दुसरा जीर्णोद्धार ठरला आहे.

भूमिपूजन कार्यक्रमास ट्रस्टचे सचिव बालेशभाई शहा, विश्वस्त, निवृत्त जिल्हा न्यायाधीश आर ए मेहता, उद्योजक भूपेंद्र श्रॉफ, एडव्होकेट तेजलकुमार आहेर यांच्यासह जागेतील भाडेकरू, दुकानचालक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related posts

पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक जाहीर !

Vishal Khandagale

शहरात एएफएमसीला पाचारण करा; आबा बागुल

Vishal Khandagale

पिंपरीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा खून; सहा अल्पवयीन आरोपींना अटक

Vishal Khandagale

Leave a Comment