Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी( दि.२३) रोजी रात्री उशिरा त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे आदी उपस्थित होते. यापूर्वीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी कोण येणार याविषयी प्रशासनात चर्चा होती. देशमुख हे पालकमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे बोलले जात आहे.

देशमुख यांना पुणे जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव आहे. यापूर्वी देखील त्यांची या पदावर ऑर्डर करण्यात आली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांना या पदावर राहता आले नव्हते. दिवंगत गायकवाड यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अतिरीक्त जिल्हाधिकारी अधिकारी त्या जिल्हाधिकारी पदावर त्यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय देशमुख हे सध्या पुण्यात कुळकायदा शाखेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र पोस्टिंग देण्यात आलेले नव्हते. या आधी त्यांनी बारामती या ठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Related posts

पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची धुवाधार “बॅटिंग”

Vishal Khandagale

उंड्री, होलेवस्ती “Micro Containment Zone “पहा!

Vishal Khandagale

कोरोना प्रतिबंधासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

Leave a Comment