Uncategorizedपुणे

शिवाजीराव भोसले बँकेच्या मुख्य कार्यालयावर ईडीची धाड

शहरातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैर व्यवहार प्रकरणी ईडीने शुक्रवारी बँकेच्या नरवीर तानाजी वाडी येथील मुख्य शाखेवर छापा टाकला आहे. याप्रकरणी ईडीच्या अधिऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

बँकेतील 71 कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संचालक आमदार अनिल भोसले यांच्यासह 16 पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यापैकी आमदार भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव यांना पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती.

या प्रकरणी योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव नऱ्हे) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी आवश्‍यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते.

Related posts

म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

कोरोना : इन्फोसिस च्या कर्मचारयाला कोरोना ची लागण

Vishal Khandagale

औरंगाबादचे ‘संभाजी नगर’ असे नामकरण झालेच पाहिजे: विकास पासलकर

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX