Pune City News
पुणे

महापालिका प्रशासन सज्ज; कमला नेहरू रुग्णालयात होणार शुभारंभ

आजपासून देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

तसेच पुण्यामध्ये 8 रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ही वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या 800 कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर दुसर्‍या टप्प्यात महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, नागरिक संरक्षण दल, गृहरक्षक दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांना लस देण्यात येईल.

यानंतर पन्नास वर्षे वयावरील व्यक्तींना आणि शेवटच्या टप्प्यात सामान्य नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्याधिकारी व कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे.

प्रत्येक बूथवर 1 लस देणारा, दोन पर्यवेक्षक आणि एका सुरक्षारक्षकासह पाच जणांची टीम असणार आहे. पोर्टलवर ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना लसीकरणाचा दिनांक आणि वेळीची माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येणार आहे.

Related posts

ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत : जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

पुणे विभागात 101 रुग्ण पॉझिटीव्ह : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Vishal Khandagale

53 हजार 9 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Vishal Khandagale

Leave a Comment