Pune City News
महाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती श्रीशंभुराजे यांचा राज्याभिषेक दिन. यानिमित्त याबाबत सविस्तर माहिती पाहुयात..

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

▪️राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्व :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला.

परत एकदा जुलमी व्यवस्थेचे सावट येऊन आपण पारतंत्र्यात जातो की काय अशी भीती रयतेच्या मनात निर्माण झाली.

अशात संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली पण राज्याभिषेक झालेला नव्हता.

स्वराज्याला दुसऱ्या छत्रपतींची आवश्यकता निर्माण झाली होती.

दरम्यान शंभू महाराज रायगडावर आले व त्यानंतर शंभु राजेंचा तात्कालिक श्रावण शु 5, शके 1602. ज्युलियन तारीख 20 जुलै 1680 रोजी शंभु राजेंचे तात्कालिक मंचकारोहण होऊन त्यांना राजा घोषित करण्यात आले.

▪️मंचकारोहण आणि राज्याभिषेक यामध्ये फरक काय? :

मंचकरोहण म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी जर वेळ किंवा उशीर होत असेल तर मंचकरोहणाद्वारे ती व्यक्ती किंवा राजा हा काळजीवाहू राजा म्हणून राज्याचा कारभार सांभाळतो.

मंचकरोहण झाल्यानंतर जवळपास 6 महिन्यांनी माघ शु 7, शके 1902. ज्युलियन तारीख 14-15-16 जानेवारी 1681 रोजी शंभु राजेंचा विधीवत राज्याभिषेक करण्यात आला.

मात्र शंभुराजांनी 16 जानेवारी 1681 या दिवशी आपला राज्याभिषेक पूर्ण करुन घेतला. खचलेल्या रयतेला आधार दिला. थोरल्या महाराजांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील याची हमी दिली.

खऱ्या अर्थाने शंभुराजांनी लोकांना परत एकदा उभे केले. त्यांच्यात इतका स्वाभिमान भरला की, शंभुराजांच्या जाण्यानंतरही इथली रयत त्या स्वाभिमानावर अविरत झुंजत राहिली.

औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी इथल्याच मातीत संपवले. या थोर धर्मवीर राजाला मानाचा मुजरा!

(लेट्स उप वरून )

Related posts

युवकाला फेकले 11 व्या मजल्यावरून

Vishal Khandagale

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याच्या सूचना

Vishal Khandagale

कामगारांना दिला दिलासा : सरकार

Vishal Khandagale

Leave a Comment