Pune City News
राष्ट्रीय

पीएम केअर फंडाचा हिशोब द्या !

करोना काळात उपाययोजना आणि मदतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या पीएम केअर फंडाचा, १०० सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत हिशोब मागितला.

पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, जमा झालेला निधी आणि खर्च यांचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

“पीएम केअर फंडाच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकतेचा अभाव आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना राज्यांची सरकारं त्रस्त झाली होती.

त्यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि अजूनही आहे,” असंही या अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे.

पीएम केअर फंडात किती निधी जमा झाला आणि किती खर्च करण्यात आला, याचा हिशोब सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

Related posts

‘येस बँक’ निर्बंधमुक्त होणार!

Vishal Khandagale

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा !

Vishal Khandagale

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Vishal Khandagale

Leave a Comment