राष्ट्रीय

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन !

Pune City News:- भारताने आजच्याच दिवशी एक मोठा इतिहास रचला होता. त्यामुळे भारताच्या दृष्टीने आजच्या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे.

आजच्या दिवशी देशात तंत्रज्ञानची मोठी क्रांती झाली. हा दिवस इतिहासात ‘पोखरण अणु चाचणी’ (1998) आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. याबाबत जाणून घेऊयात..

◆ पोखरण येथील अणु चाचणी यशा नंतर सन 1999 पासून देशात 11 मे हा तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

◆ 11 मे 1988 हा दिवस म्हणजे भारताने पोखरणमध्ये केलेल्या 5 अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता.

◆ भारताने ऑपरेशन ‘शक्ती’ या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.

◆ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला आव्हान देत अणूबॉम्बची चाचणी करत जगात भारताचा दबदबा वाढवला होता.

◆ 58 KG टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित करत जगाला धक्का दिला.

◆ अमेरिकेच्या दबावाखाली भारताला अणूचाचणी पुढे ढकलावी लागल्याने मग दुसऱ्यांदा भारताने कुठलीही कसर ने सोडता अतिशय गुप्तपणे हि चाचणी केली.

◆ डॉ. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट देत अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. अखेर यानंतर अणुचाचणी यशस्वी झाली.

◆ भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेले पहिले स्वदेशी विमान ‘हंसा 3’ ची यशस्वी चाचणी केली.

◆ डीआरडीओने ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचे महत्त्व आणखी वाढवले.

भारताने तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीची साक्ष देणारा आजचा दिवस असल्याने येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रगती करण्याची प्रेरणा देण्यासाठी 11 मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून पाळण्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती.

Related posts

निर्भयातील चारही आरोपींना फाशी

Vishal Khandagale

आत्मनिर्भर भारत हेच उद्दिष्ट : पीएम मोदी

Vishal Khandagale

“सॅनिटायझर्स” व मस्क च्या काळा बाजारा करणरया वर पोलीसांची कार्यवाही

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX