Pune City News
पुणे

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना संस्कृती विसरु नका

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्रा.डॉ.गजानन एकबोटे, प्रा. शामकांत देशमुख, प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा.सुरेश तोडकर, डॉ. राजेंद्र झुंजार तसेच शिक्षण व अन्य विभागातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सेंट्रल सॉफीस्टीकेटेड ऍनालेटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबीनचे डिजिटल स्वरुपात अनावरण व सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच प्रा.डॉ. गजानन एकबोटे व प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत.

परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. सदाचार ही जीवनातील महत्वपूर्ण बाब आहे.

सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो, यासाठी सदाचारी बना. आपल्या मातृभूमीचा व मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा, असे त्यांनी सांगितले.

Related posts

कोरोना: कॉर्पोरेटची स्वयंम-स्फूर्ती ने “वर्क फॉर्म होम”ला साथ

Vishal Khandagale

हौशी नगरसेवकांचे खेळ थांबवा: आम आदमी पार्टी निवेदन

Vishal Khandagale

फरासखाना पोलीसांकडून बंगाली सोने कारागिरांना अन्नधान्याचे वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment