Pune City News
पुणे

पुणे जिल्हा न्यायालयातील पार्किंग होणार सुटसुटीत

पुणे जिल्हा न्यायालयात गेल्यानंतर वाहन पार्क करण्यासाठी वकिलांना करावी लागणारी शोधाशोध थांबणार आहे. तसेच वकीलआणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना वाहनांसाठी स्टिकर देण्यात येणार आहेत. स्टिकर असलेल्या वाहनांनाच न्यायालयात प्रवेश मिळणार असल्याने पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे आतील कोंडी कमी होईल.  व  वाहन पार्किंगचे व्यवस्थापन करण्यासाठी ३ कर्मचारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत .

याबाबत पुणे बार असोसिएशन अध्यक्ष अँड. सतीश मुळीक यांनी सांगितले की न्यायालयात विनाकारण होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे वकील आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी पार्किंग चे स्टिकर देणे  व त्यांची नोंद ठेवण्यात येईल . संबधीताना स्टिकर चे वाटप करण्यासाठी त्यांच्या नोंदीचे रजिस्टर केले जाईल ज्या वकीलांना पार्किंग चे स्टिकर घ्यायचे आहेत. त्यांनी वकील असल्याची याची खातरजमा करून तसेच त्यांचे नाव, सनद नंबर ,वाहन क्रमांक ची नोंदीणी  करावी. नोंदणी झाल्यानंतर वकिलांना स्टिकर देण्यात येईल या सर्व प्रक्रिये साठी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी परवानगी दिली आहे .

सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे एकाद्या पुण्यातील आरोपी बरोबर २० ते २५ जण न्यायलायत येतात त्यामुळे पार्किंग ची जागा व्यापली जाते व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो . न्यायालायने पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याने वाहन पार्किंग चा प्रश्न पुन्हा डोकं वर काढू शकतो म्हणून हे सर्व नियोजन करण्यात आले आहे. अँड सतीश हिंगणेकर ( सरचिटणीस पुणे बार असो.)

Related posts

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रा

Vishal Khandagale

खराडी येथील कोविड सेंटर रुग्णालयावर स्थानिक नागरिकांची दगडफेक

Vishal Khandagale

खासदारांनी साधला उपेक्षितांशी संवाद

Vishal Khandagale

Leave a Comment