Pune City News
मनोरंजन

अलिबाग लघुपट महोत्सव येत्या रविवारी

नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठी चित्रपट परिवार आणि द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स तर्फे मोशन पिक्चर्स तर्फे येत्या रविवारी (24 जानेवारी) अलिबाग लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अलिबाग मधील कार्ले खिंड येथील द हार्मनी हार्मनी रिसॉर्ट येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हा महोत्सव होणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी पाच या वेळेत भारतासह अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स आदी विविध देशातील 100 हून अधिक लघुपटाचे प्रदर्शन या महोत्सवामध्ये करण्यात येणार आहे. लघुपट प्रदर्शनानंतर सायंकाळी पाच वाजता महोत्सवातील स्पर्धा विभागातील पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमोशन द डार्क मोशन पिक्चर चे प्रमुख रामकुमार शेडगे यांनी दिली
महोत्सवातील लघुपटांमधून अकरा विविध गटांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे पारितोषिक वितरण होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला राहणार आहे.

Related posts

गायिका कनिका कपूरला ‘कोरोना’ची लागण

Vishal Khandagale

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज

Vishal Khandagale

या मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा !

Vishal Khandagale

Leave a Comment