Pune City News
राष्ट्रीय

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण, लॅपटॉपमधील ‘ती’ पत्रे हॅकर्स चा कारनामा !

भीमा कोरेगाव

भीमा कोरेगाव  प्रकरण आणि नक्षलवादी कनेक्शनच्या आरोपाखाली ज्या पत्राच्या आधारावर सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, तो दस्तावेज सायबर हॅकर्सनी लॅपटॉपचा ताबा मिळवून प्लांट केला होता, असा दावा डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रातील आर्सेनल कन्सल्टिंग या अमेरिकन कंपनीने केला आहे. या अहवालाच्या आधारे वॉशिंग्टन पोस्टने वृत्त दिले असून संबंधित कंपनीचा अहवाल बुधवारी मुंबई हायकोर्टातही सादर करण्यात आला.

कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले रोना विल्सन यांच्या लॅपटॉपचा डिजिटल फॉरेन्सिक अहवाल त्यांचे वकील सुदीप पासबोला यांनी हायकोर्टात सादर केला. या लॅपटॉपची इलेक्ट्रॉनिक कॉपी आर्सेनल कन्सल्टिंगला पाठवण्यात आली होती. त्याआधारे आर्सेनलने तपास करून आपला अहवाल दिला आहे. त्यात विल्सन यांच्या लॅपटॉपमधील स्फोटक पत्रे हॅकर्सनी प्लांट केली होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याआधारेच विल्सन यांच्यावरील सर्व आरोप रद्द करण्यात यावेत आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती पासबोला यांनी हायकोर्टात केली आहे.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, विल्सन यांना अटक होण्याआधीच त्यांच्या लॅपटॉपवर हॅकर्सने ताबा मिळवला होता. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅकरने या लॅपटॉपमध्ये स्फोटक माहिती असलेली दहा पत्रे प्लांट केली. हिडन फाइल्स बनवून ही पत्रे सेव्ह करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या घडवून सरकार उलथवून टाका, अशा आशयाचा मजकूर या पत्रात आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

या फाइल्स विल्सन यांनी ओपनही केलेल्या नाहीत, असे आर्सेनलच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हा हॅकर कोण आहे, याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही. या प्रकरणात विल्सन यांना मुख्य आरोपी बनवण्यात आलेले आहे. आता अमेरिकन कंपनीच्या अहवालाने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

 

Related posts

एक देश एक रेशन कार्ड’ योजना सुरु!

Vishal Khandagale

देशातील मृतांचा आकडा 11वर, तामिळनाडूत करोनाचा पहिला बळी

Vishal Khandagale

कोरोना: पंतप्रधान मोदी ‘आज’ देशाला संबोधित करणार !

Vishal Khandagale

Leave a Comment