पुणे शहर

पुणे न्यायालायचे कामकाज आता 2 शिफ्टमध्ये चालणार

पुणे शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन.  जिल्हा न्यायालयात नव्या नियमावली नुसार न्यायालायचे   कामकाज आता २ शिफ्टमध्ये करण्यात आले आहे. तसेच ज्यांच्या खटल्याची सुनावणी आहे, अशानांच न्यायालय परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. उच्च न्यायालयाने लागू केलेल्या नियमावलीचा आधारे हा निर्णय घेतला आहे.

याबाबत बार असोसिएशनची बुधवारी (दि. २४ ) बैठक पार पडली. त्यात ही नियमावली लागू केली आहे. त्यानुसार, न्यायालयीन कामकाज दोन शिफ्टमध्ये चालणार आहे. यात पहिली शिफ्ट सकाळी १०:३० ते १  आणि दुसरी शिफ्ट १:३०  ते दुपारी ४  वाजेपर्यंत राहील. न्यायालयीन कामकाज करताना न्यायाधीश वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी नसतील तर विरुद्ध आदेश पारित होणार नाही. न्यायालय परिसरात वकील, साक्षीदार, आरोपी आणि व्यक्तीश: काम चालवणारे पक्षकार, ज्यांच्या तारखांची डेली बोर्डवर नोंद असेल अशांना प्रवेश दिला जाणार आहे. कोर्ट हॉलमध्ये जोपर्यंत नाव पुकारले जात नाही, तोपर्यंत कोणीही आत मध्ये प्रवेश करावयाचा नाही. तसेच कामकाज संपल्यानंतर संबधित वकिलांना न्यायलय परिसरात न थांबण्याची विनंती बार असोसिएशनने केली आहे.

Related posts

आज शहरात 4103 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

धायरीत फॅन्सी फटका कारखान्याला आग

Vishal Khandagale

दिलासादायक … नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त !

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX